‘फँड्री’तली शालू झळकणार बॉलिवूडपटात; राजेश्वरीला मिळाले बॉलिवूडचे तिकीट

पुणे – ‘फँड्री’ या बहुचर्चित चित्रपटातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातला बॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. पुणे टू गोवा  चित्रपटातून राजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून या अगोदर राजश्रीने फँड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटातून अभिनय केला होता. अमोल भगत दिग्दर्शित पुणे टू गोवा या चित्रपटात राजेश्वरी दिसणार आहे. याच बरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली असून हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि ॲक्शन रसिकांना पाहता येणार आहे.

वास्तविक हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणाऱ्या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे, पण या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान  येणाऱ्या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत यांनी दिली.