Rajya Sabha Elections | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल हे लोकसभेवर खासदार म्हणून गेल्याने त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. उद्या राज्यसभा निवडणुकीसाठी ( Rajya Sabha Elections) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवरुन उमेदवारी मिळण्यासाठी 11 ते 12 जण इच्छूक आहेत. यात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar), बाबा सिद्दिकी, छगन भुजबळ, आनंद परांजपे इच्छूक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेवर पाठवून थेट त्यांना राज्यमंत्रीपद द्या अशी मागणी जोर धरत आहे.
उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये उमेदवारीचा हा सस्पेन्स संपू शकतो.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Sharad Pawar | हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही; पवारांचा मोदींना टोला
Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार