राखी सावंतला बेदम मारहाण करतो पती आदिल दुर्रानी, जखमांचे फोटो केले शेअर

राखी सावंतने (Rakhi Sawant) तिचा पती आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) अनेक आरोप केले आहेत. राखीने आदिलवर विवाहबाह्य संबंध आणि फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केली. त्यानंतर आदिलला मुंबई पोलिसांकडून राखीच्या घरातून अटक करण्यात आली. राखीने आदिलवर मारहाणीचा आरोपही केला होता. आता राखीच्या भावानेही तिच्यासोबत झालेल्या भांडणाचे पुरावे दाखवले आहेत. राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत आणि मित्र वाहिद खान यांनी अभिनेत्रीसोबत झालेल्या मारहाणीचे पुरावे आणि वैद्यकीय अहवाल दाखवले आहेत, ज्यामुळे आदिल तिच्यावर अत्याचार करतो हे सिद्ध झाले आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

राखीचा भाऊ राकेश सावंत याने माध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राकेश आणि वाहिद यांनी राखीच्या हातावरील जखमेच्या खुणा दाखवल्या आणि ‘तुम्हाला ते किरकोळ वाटत असेल’, असे सांगितले. यानंतर वाहिदने राखीचा आणखी एक फोटो दाखवला ज्यामध्ये तिच्या मानेजवळ जखम दिसत आहेत.

राखीचे फोटो दाखवत वाहिद म्हणाला, ‘हा फोटो राखीच्या आईचा मृत्यू झाला त्या दिवसाचा आहे’. यासोबतच वाहिद आणि राकेश यांनी कूपर हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्टही दाखवला आहे.

 

राखीचा पती आदिल खानला ताब्यात घेतले
दरम्यान, काल रात्री राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीबद्दल (Rakhi sawant Husband Adil Khan Durrani) अनेक खुलासे केले आणि त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. आदिलविरुद्ध मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना राखी सावंतने आदिलने तिच्याकडून पैसे आणि दागिने घेतल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंतने असेही सांगितले आहे की, आदिल तिच्यावर अत्याचार करतो. तसेच राखीने आदिल खानचे दुसर्‍या मुलीसोबत एक्स्ट्रा मटेरियल अफेअर असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यानंतर मुंबईतील ओशिवरा पोलीसांनी आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाबाबत डीसीपी झोन ​​9 अनिल पारसकर यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, राखी सावंत यांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास करत आहोत, आदिलला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत राखी सावंतसोबत लग्न करून नंतर माघार घेणाऱ्या आदिल दुर्राणीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.