आदिल खान Bisexual, डोक्यावर केसही नाहीत; राखी सावंतचा पतीवर धक्कादायक आरोप

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. दुसरीकडे राखी सावंत आदिलला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी राखीने नुकतीच आदिलच्या पहिली गर्लफ्रेंडची (Roshina Delavari) भेट घेतली आहे. या भेटीत आदिलबाबत दोन मोठे सत्य राखीसमोर आले, त्यापैकी एक म्हणजे आदिल बायसेक्शुअल (Bisexual) आहे.

नुकतीच राखी सावंत आदिल खानच्या पहिल्या गर्लफ्रेंड रोशिना डिलवारीला भेटायला गेली होती. यादरम्यान दोघींनी कॅमेऱ्यासमोर खूप गप्पा मारल्या. दोघांनीही एकमेकांची व्यथा समजून घेतली आणि एवढेच नाही तर आदिलबद्दलच्या अनेक धक्कादायक गोष्टी या भेटीत समोर आल्या. राखी जेव्हा आदिलच्या पहिल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेली तेव्हा तिथल्या कोणीतरी तिला आदिल खान बायसेक्शुअल असल्याचं सांगितलं. याशिवाय आदिल खरंच बोल्ड असल्याचेही राखीला पहिल्यांदाच कळले. राखीला हे जाणून धक्का बसला आहे की आदिलने तिला हे सत्य कधीच कळू दिले नाही की तो उभयलिंगी आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत.

दरम्यान राखीने पतीवर घरगुती हिंसाचार, पैशांची फसवणूक आणि धोखाधडीचे आरोप केले आहेत. राखीने आधीच स्पष्ट केले आहे की ती आदिलला घटस्फोट देणार नाही आणि त्याला जामिनावर बाहेरही येऊ देणार नाही. या कठीण काळात राखीला अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांचा पाठिंबा मिळत आहे.