राखी सावंतने गुपचूप उरकलं दुसरं लग्न? बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत केलं कोर्ट मॅरेज

हिंदी सिनेसृष्टीतील ‘ड्रामा क्विन’ राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच तिने बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर तिच्या आईचा रुग्णालयातील व्हिडिओ शेअर करत त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. यानंतर आता राखीने गुपचूप लग्न केलं असल्याची (Rakhi Sawant Wedding) माहिती समोर येत आहे. तिने तिचा प्रियकर आदिल खान दुर्रानी (Adil Durrani) याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले असून हे राखीचे दुसरे लग्न (Rakhi Sawant Second Wedding) आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

राखी सावंत आणि आदिल दुर्राणी यांचे कोर्ट मॅरेजचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये राखी सावंत पांढरा आणि गुलाबी रंगाचा शरारा परिधान केलेला दिसत आहे. राखीने डोक्यावर ओढणीही घेतल्याचे दिसत आहे. तर आदिल ब्लॅक शर्ट आणि डेनिम्समध्ये सिंपल लूकमध्ये दिसत आहे. दोघांच्याही गळ्यात वरमाळा दिसत आहे.

दुसऱ्या फोटोत राखी सावंत लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत आहे आणि आदिल तिच्यासोबत बसला आहे. आणि तिसरा फोटो राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्या विवाह प्रमाणपत्राचा आहे. असे असले तरीही, अद्याप राखी किंवा आदिलने त्यांच्या लग्नाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

राखी सावंतचे हे दुसरे लग्न आहे. राखी सावंतने यापूर्वी रितेश नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते. राखी बराच काळ रितेशच्या नावाचा सिंदूर लावत असे, त्यानंतर ड्रामा क्वीनने बिग बॉस 15 मध्ये रितेशचा चेहरा दाखवला. शो सोडल्यानंतर राखी सावंतने एक मोठा खुलासा केला की तिचा नवरा आधीच विवाहित आहे, त्यामुळे त्यांचे लग्न वैध नाही आणि त्यानंतर राखीने रितेशसोबतचे सर्व संबंध तोडले.