ब्रेन ट्यूमरमुळे आईची झालेली अवस्था पाहून राखी सावंतला कोसळलं रडू, चाहत्यांकडे केली प्रार्थना

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली आहे. घरी परतताच तिला एक वाईट बातमी मिळाली आहे. राखीची आई (Rakhi Sawant’s Mother) जया भेडा यांना कँसरनंतर ब्रेन ट्युमर (Brain Tumor) झाला आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आईला अशा अवस्थेत पाहून राखी तिच्या भावनांना आवर घालू शकली नाही आणि ती ढसाढसा रडू लागली. या भावनिक प्रसंगाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिची आई देखील दिसत आहे.

व्हिडिओमध्ये राखी सावंत सांगते की, ती रविवारी रात्रीच बिग बॉस मराठीमधून बाहेर पडली. घरी येताच तिला कळले की तिच्या आईची तब्येत ठीक नाही. आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहोत. मम्मीला कँसर आहे आणि आता तिला ब्रेन ट्यूमर झाला आहे. तसेच राखीने तिच्या चाहत्यांना तिच्या आईसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. माझ्या आईला या आजारातून बरे होण्यासाठी प्रार्थनांची गरज आहे, असे तिने म्हटले आहे.

राखीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही येत आहेत. व्हिडिओखाली गायिका अफसाना खानने कमेंट केली आहे की, ‘बहिण, धीर धर बहिण. वाहेगुरु, अल्लाह दया कर.’

सलमानने मदत केली होती
अनेक चाहत्यांनी राखी आणि तिच्या आईसाठी प्रार्थनाही केल्या आहेत. राखी सावंतला चाहते प्रोत्साहन देत आहेत. बरेच चाहते राखीला धीर देत म्हणत आहेत की, सर्वकाही ठीक होईल. राखी सावंतला रडताना पाहून तिचे चाहतेही तिचे सांत्वन करत आहेत. राखी बऱ्याच दिवसांपासून बिग बॉस मराठीमध्ये दिसली होती. यापूर्वी ती बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. त्यानंतरही तिनी शोमधून मिळालेले पैसे आईच्या उपचारासाठी वापरले होते. तिच्या आईच्या उपचारासाठी सलमान खान आणि करण जोहरनेही तिला मदत केली होती.