अमित शहांनी साऊथ सुपरस्टार रामचरण आणि चिरंजीवी यांची घेतली भेट, पाहा फोटो

नवी दिल्ली- साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजामौली (SS Rajamauli) यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. या चित्रपटातील नाटू नाटू (Natu Natu) या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकून देशाचा गौरव केला आहे. या गाण्याने सर्वोत्कृष्ट ओरिजिनल कॅटेगरीत ऑस्कर अवॉर्ड जिंकून देशभरात आनंदाची लाट पसरवली आहे.

अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी दिल्लीत राम चरण आणि त्याचे वडील चिरंजीवी (Chiranjeevi) यांची भेट घेतली आहे. नाटू नाटूसाठी ऑस्कर जिंकल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले.

राम चरण आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत अमित शहा आणि राम चरण हातात फुलांचा गुच्छ धरलेले दिसत आहेत. त्याचवेळी साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीही त्यांच्या शेजारी उभे आहेत. राम चरण, चिरंजीवी एवढेच नाही तर खुद्द अमित शाह यांनीही त्यांच्या ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहे.