‘किती आले आणि गेले भाजपाचं काही वाकड करू नाही शकले’

मुंबई – मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याची सध्या बरीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. ममता यांचा हा दौरा आता काहीसा वादग्रस्त देखील बनू लागला आहे. कारण ममता यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई भाजपा नेत्यांनी ममता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी भाजपा नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.

भाजप आमदार राम सातपुते यांनी याच मुद्यावरून ममता यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. अर्धवट राष्ट्रगीत ते पण चार शब्द बसून,चार शब्द उठून.शिवसेना आणि साहेबांच्या राष्ट्रवादीला असल्याचं बिनबुडाच्या प्रवृत्तीचा शोध होता वाटत. किती आले आणि गेले भाजपा च काही वाकड करू शकले नाही अशी घणाघाती टीका सातपुते यांनी केली आहे.

 

दुसऱ्या बाजूला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. एकतर त्या राष्ट्रगीत बसून म्हणाल्या इतकंच नाही तर राष्ट्रगीत अर्धवट म्हणत उठल्या. या अवमानासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, परंतु देशाभिमानापेक्षा त्यांना राजकारण मोठे वाटले अशी टीका दरेकर यांनी केली आहे.