‘150 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या लेकरांना भेटायला मुख्यमंत्र्यांनी वेळ नाही दिला पण…’

मुंबई – शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवल्यावर साधी विचारपूस देखील न करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल शिवसेनेच्या फायर आज्जी ( Mumbai Shivsainik Aaji ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 80 वर्षाच्या चंद्रभागा शिंदे ( Chandrabhaga Shinde ) यांना भेटण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह परळ येथील दाभोळकर वाडी येथे आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे(Rashmi Thackeray) , मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray ) होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी फायर आजीसाठी हापूस आंब्याच्या चार पेट्या आणलेल्या होत्या. यावेळी आदित्य ठाकरे आणि तेजस यांनी आज्जीचा आशीर्वाद घेतला. यासोबतच ठाकरे कुटुंबीय आणि चंद्रभागा शिंदे यांच्यासोबत फोटो काढला. दरम्यान, या घडामोडींवर भाजप आमदार राम सातपुते (BJP MLA Ram Satpute) यांनी भाष्य केले आहे.

हळव्या मनाच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या 150 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या लेकरांना भेटायला वेळ नाही दिला पण मातोश्री च्या दारात आलेल्या आजींना भेटायला थेट गेले . हळवं मन मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) आली की जाग होतं. असं सातपुते यांनी म्हटले आहे.