समीर वानखडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा, रामदास आठवले आक्रमक

ramdas aathwale - sameer wankhede - malik

मुंबई : समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत. नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे. समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम नवाब मलिक यांनी थांबावावं आणि त्यांना जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. समीर वानखडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकार ने संरक्षण द्यावे. समीर वानखडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला.

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी हा ईशारा दिला आहे. आर्यन खान यांच्या विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे न्यायालयात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर न्यायालयाने तात्काळ आर्यन खान यांना जमीन दिला असता. याबाबत समीर वानखडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. समीर वानखडे यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. असं आठवले म्हणाले आहेत.

ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नारकोटिक्स विभाग करीत आहे.तेच काम समीर वानखडे करीत आहे. युवा पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचविण्याचे काम देशहिताचे असून असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नसून उलट आशा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे समीर वानखडे यांच्या केसाला ही धक्का लागला तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao

Previous Post
kiran gosavi - prabhakar sail

एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली, गोसावीच्या बॉडीगार्डचे धक्कादायक खुलासे

Next Post
ramdas aathwale - sameer wankhede

वानखडे हे मागासवर्गीय अधिकारी असून त्यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर… – आठवले

Related Posts
रोमान्स, ड्रामा आणि ऍक्शनचा थरार असलेला 'लॉ ऑफ लव्ह'

रोमान्स, ड्रामा आणि ऍक्शनचा थरार असलेला ‘लॉ ऑफ लव्ह’

Law of Love : आजवर प्रेम म्हणजे काय? याचा अर्थ सांगणारे अनेक मराठी सिनेमे आपण पाहिले आहेत. परंतु…
Read More

जोपर्यंत बाबा जिंकत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नाही; नवज्योत सिंह सिद्धूच्या कन्येची भीष्मप्रतिज्ञा

अमृतसर – पंजाब कॉंग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच धुसफूस सुरु आहे. यातच आता कॉंग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धूची…
Read More
योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल; राहुल गांधींचं भाष्य | Rahul Gandhi

योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल; राहुल गांधींचं भाष्य | Rahul Gandhi

Rahul Gandhi | सध्या देशात आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. महाराष्ट्रातही मराठा आणि…
Read More