शेतकऱ्यांना भडकवणाऱ्या राकेश टिकेत सारख्या नेत्यांवर कारवाई करावी – रामदास आठवले

शेतकऱ्यांना भडकवणाऱ्या राकेश टिकेत सारख्या नेत्यांवर कारवाई करावी - रामदास आठवले

मुंबई – कानून वापसी तो घर वापसी अशी घोषणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. सरकार ने तिन्ही कृषी कायदे रद्द केले असताना शेतकरी नेत्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे.तरीही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना भडकवीणाऱ्या राकेश टिकेत सारख्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.कृषी कायदे रद्द केल्याने आता शेतकऱ्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे. कायदे रद्द केल्यास आंदोलन थांबविणार असा शब्द शेतकरी नेत्यांनी दिला होता तो शब्द शेतकरी नेत्यांनी पाळला नाही. ही गद्दारी आहे.नीतिमत्ता नसलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे. शेतकरी आंदोलन आता थांबविले पाहिजे.

शेतकरी नेते आता शेतकऱ्यांना आंदोलनात डांबून त्यांना त्रास देत आहेत.दीर्घ काळ चाललेले आंदोलन कृषी कायदे रद्द झाल्याने बंद केले पाहिजे. राकेश टिकेत सारखे नेते शेतकऱ्यांना न्याय देण्याचा नावाने आंदोलनात ठेऊन अधिक त्रास वाढवीत आहेत.कानून वापसी तो घर वापसी हा शब्द राकेश टिकेत पाळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=f7tTxoGti_0

Previous Post
करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट!

करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट!

Next Post
'महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार'

‘महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार’

Related Posts
पाकिस्तान

पाकिस्तानातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कारखाना बंद, अनेक कंपन्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची अर्थव्यवस्था (economy) सतत ढासळत आहे. परकीय चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आला आहे. पाकिस्तानला परदेशातूनही…
Read More
आज आहे महाकुंभ २०२५ चे पहिले शाही स्नान, त्यामधील नियम आणि श्रद्धेबद्दल वाचा

आज आहे महाकुंभ २०२५ चे पहिले शाही स्नान, त्यामधील नियम आणि श्रद्धेबद्दल वाचा

सनातन धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा कार्यक्रम, महाकुंभ, १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. प्रयागराजमध्ये २६ फेब्रुवारी…
Read More

Video: प्रभू श्रीरामांच्या भक्तीत रमले ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहते, लगावले ‘जय श्री राम’चे नारे

Australian Fans Raised Slogans of Jai Shri Ram: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाबाबत (ICC ODI World CUP 2023) चाहत्यांमध्ये प्रचंड…
Read More