मुंबई : कानून वापसी तो घर वापसी अशी घोषणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. सरकार ने तिन्ही कृषी कायदे रद्द केले असताना शेतकरी नेत्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे.तरीही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना भडकवीणाऱ्या राकेश टिकेत सारख्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
आठवले म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.कृषी कायदे रद्द केल्याने आता शेतकऱ्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे. कायदे रद्द केल्यास आंदोलन थांबविणार असा शब्द शेतकरी नेत्यांनी दिला होता तो शब्द शेतकरी नेत्यांनी पाळला नाही. ही गद्दारी आहे.नीतिमत्ता नसलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे.
शेतकरी आंदोलन आता थांबविले पाहिजे. शेतकरी नेते आता शेतकऱ्यांना आंदोलनात डांबून त्यांना त्रास देत आहेत.दीर्घ काळ चाललेले आंदोलन कृषी कायदे रद्द झाल्याने बंद केले पाहिजे. राकेश टिकेत सारखे नेते शेतकऱ्यांना न्याय देण्याचा नावाने आंदोलनात ठेऊन अधिक त्रास वाढवीत आहेत.कानून वापसी तो घर वापसी हा शब्द राकेश टिकेत पाळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले.