लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर शिर्डी मतदारसंघाचे सोने करू – रामदास आठवले

शिर्डी – मागील 2009 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) माझा शिर्डी मतदारसंघात पराभव झाल्याची खंत शिर्डीतील जनतेच्या मनात आहे.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातुन निवडणूक लढण्याची संधी मला मिळाली तर शिर्डीतील मतदार माझ्या पराभवाची खंत दूर करण्यासाठी मला बहुमताने निवडून देतील. त्यामुळे शिर्डी मतदारसंघाचे सोने केल्याशिवाय मी राहणार नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे(Republican Party) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी केले.

भाजप शिवसेना आणि आरपीआय च्या युतीमुळे ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने तसेच शिर्डी मतदारसंघातील गावागावात माझा संबंध सम्पर्क आहे. त्यामुळे मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन निवडुन येऊ शकतो. शिर्डी मतदारसंघातून मी निवडणूक लढणार आहे असा निर्धार ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. शिर्डी मतदार संघाचे सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने मध्ये आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ भाजप आणि शिवसेना यांच्या पक्षश्रेष्ठींनी विचार करुन रिपब्लिकन पक्षाला सोडला पाहिजे असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

आज शिर्डी येथील हॉटेल शांती कमल येथे रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रामदास आठवले बोलत होते. येत्या दि. 27 आणि 28 रोजी दोन दिवसांचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य स्तरीय अधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी यावेळी केली. रिपब्लिकन पक्षाचे सभासद नोंदणी अभियान त्वरीत यशस्वी करण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी ज्या जिल्ह्यात यशस्वी होणार नाही त्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकारीणी बरखास्त करण्यात येईल असा ईशारा रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

नागालँड(Nagaland) मध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार स्वबळावर निवडून आले त्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे आमदार कसे निवडुन येतील याचा विचार करण्याचे आणि जिंकून येणाऱ्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देण्याबाबत रणनीती ठरविण्याचे मार्गदर्शन रामदास आठवले यांनी केले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपल्या केंद्रियराज्यमंत्री पदाचा योग्य उपयोग होऊन केंद्र आणि राज्य सरकार च्या विविध योजना आणि निधी आणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवू; शिर्डी चा विकास करून शिर्डी त खासदार होण्याची संधी मिळाली तर शिर्डी मतदारसंघाचे सोने करू असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.