Ramdas Athawale | नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्यासाठी मुंबईच्या सर्व जागा महायुती जिंकणार

Ramdas Athawale | नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे विकासपुरुष ठरले आहेत.जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत.त्यांना देशाला वेगवान विकासाच्या मार्गावर भरधाव पुढे नेले आहे.त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा जागांवर महायुती च्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.वरळी बिडीडी चाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित दक्षिण मुंबई मतदार संघाच्या महायुती च्या लोकप्रिय उमेदवार यामिनीताई जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित रिपाइं कार्यकर्त्यांच्या संमेलनात ना. रामदास आठवले बोलत होते.दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाच्या महायुती च्या उमेदवार यामिनीताई जाधव या लढाऊ उमेदवार आहेत.

यामिनी या रणरागिणी आहेत.बौद्ध आंबेडकरी जनतेच्या त्या भिमकन्या आहेत.त्यांना गरीब बहुजनांचे झोपडपट्टी वासियांचे प्रश्न त्या जाणतात.दक्षिण मुंबई मध्ये विकासाची कामे करून दक्षिण मुंबईला सोन्याची मुंबई करण्या साठी यामिनी ताई जाधव यांना निवडून दिले पाहिजे. त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी घरघरात जाऊन महायुतीचा प्रचार करावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप