‘संजयजी शेपूट का घालताय? डरकाळी फोडणारे राऊत घाबरले का? कर्नाटकात का गेले नाही?’

रत्नागिरी  – 30 मार्च 2018 ला खासदार संजय राऊतांनी कर्नाटकात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं होतं. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र दाऊदला दम देणारे राऊत यांनी तिकडे जाणे टाळले आहे .

बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला यापूर्वीच केला होता . मला बेळगावला बोलावणं हा कट आहे. त्यांना माझ्यावर हल्ला करायचाय. मला अटकही करण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्र घाबरणारा आणि झुकणारा नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी जाणार आणि आपली बाजू मांडणार अशी डरकाळी देखील त्यांनी फोडली होती मात्र एवढी सगळी भाषणबाजी करूनही संजय राऊत हे तिकडे फिरकलेच नाहीत.

याच मुद्द्यावरून शिंदे गटाची मुलुखमैदानी तोफ असणाऱ्या रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.  संजयजी आता शेपूट का घालताय? कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत घाबरले का, असा सवाल माजी मंत्री रामदास कदम यांनी विचारला आहे. मला देखील कर्नाटक न्यायालयाने समन्स काढले होते व मी सुद्धा कर्नाटकात जाऊन आलो. सीमाभागातील मराठी लोकांनी माझे तिथे स्वागत केले आणि माझ्या जामिनासाठी तिथल्याच मराठी लोकांनी 10 लाखांचे सहकार्य केले होते, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.

ते म्हणाले, ‘ संजय राऊत हे स्वतःला वाघ समजतात. तुम्ही का घाबरता? माझ्यावर हल्ला होईल… आपला मराठी माणूस एवढा घाबरतो, हे दाखवू नका. संजयजी तुम्ही शेपूट घालू नका. तुमच्यात एवढा अचानक का बदल झाला? मला जामीन दिला तसा तिथे गेल्यावर तुम्हालाही देतील. मराठी माणसे खंबीर आहेत.. संजयजी तुम्ही घाबरू नका आणि मराठी माणूस पळपुटा आहे असा संदेश देऊ नका, तुम्ही कर्नाटकात जा तेथील मराठी लोक तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहतील, असा सल्ला देखील रामदास कदम यांनी संजय राऊत यांना दिला आहे.