राणा दाम्पत्याला जामीन मंजूर; देवेंद्र फडणवीस म्हणाले,…

मुंबई – राणा दाम्पत्याच्या (Navneet Rana and ravi Rana) जामीन अर्जावर आज निकाल दिला आहे. राणा दाम्पत्याला कोर्टाने दिलासा दिला असून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन यापूर्वी राहणार दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता.(Rana couple granted bail)

सोमवारी निकाल येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते मात्र सोमवारी वेळेअभावी निकाल पूर्ण लिहू शकले नसल्यामुळे देण्यात आला नव्हता त्यामुळे चार मे रोजी निकाल देण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले होते त्यामुळे राणा दाम्पत्य यांना आज दिलासा मिळतो की जेलमधील मुक्काम वाढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राणा दाम्पत्यांच्या जामिनावर बोलताना म्हणाले, राणा दाम्पत्यांना जामीन मिळणे स्वाभाविक आहे.कारण हनुमान चालीसा (Hanuman Chaalisa) वाचणाऱ्यांवर राजद्रोह ( Treason ) लावण्याचा करंटेपणा या सरकारने केला. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय कोर्टात (Court) टिकू शकत नाही त्यामुळे राणा दाम्पत्यांना जामीन मिळणं स्वाभाविक आहे तो त्यांना मिळाला.