आलिया भट्टचे लिव्हिंग रुममधले फोटोज लीक; चिडलेला रणबीर कपूर म्हणाला, त्यांच्यावर कायदेशीर…

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट (Aliya Bhatt) हिचे प्रायव्हेट फोटो लीक झाले होते. आलिया तिच्या लिव्हिंग रूममध्ये बसली होती. ती तिच्या कुटुंबीयांशी बोलत होती, यावेळी काही फोटोग्राफर्सने तिचे फोटो क्लिक केला, ज्याबद्दल तिला अजिबात कल्पना नव्हती. परंतु काही वेळानंतर आलियाला याचा अंदाज आला. आपल्या परवानगीविना आपले फोटो क्लिक केल्याने आलियाला त्या फोटोग्राफर्सविरोधात आवाज उठवला आहे.

आलियाने सांगितले की, तिच्या घराजवळील इमारतीतील दोन फोटोग्राफर तिच्या संमतीशिवाय आणि तिच्या नकळत फोटो क्लिक करत होते. ही गोपनीयतेचा भंग करणारी बाब होती. म्हणजेच काही अज्ञात व्यक्तीने खाजगी जागेत हस्तक्षेप केला आणि आलियाला याची माहिती नव्हती.

आलियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘तुम्ही माझी मस्करी करत आहात का? मी माझ्या दिवाणखान्यात आरामात बसले होते आणि अचानक मला जाणवले की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे. मी तोंड वर केले तर मला दिसले की जवळच्या बिल्डिंगमधून दोन लोक माझे फोटो काढत आहेत. जगात कुठे लिहिलंय की असं कोणाच्या गोपनियतेचा भंग करणं योग्य आहे?’

रणबीर कपूरने दिली प्रतिक्रिया
या घटनेवर आता आलियाचा पती आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने प्रतिक्रिया दिली आहे. रणबीर म्हणाला की, “हे अत्यंत मूर्खपणाचे कृत्य आहे. खासगी जागेत जाऊन हे कृत्य करण्यात आले आहे. माझ्या घरात जे काही चालले आहे ते शूट करू शकत नाही. ते माझे घर आहे. माझ्या घरात माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कोणाचेही फोटो क्लिक करू शकत नाही. असे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य कायदेशीर मार्ग स्वीकारत आहोत. मला त्याबद्दल अधिक बोलायचे नाही. पण खरच ही सारी घटना वाईट झाली आहे.”

रणबीर पुढे म्हणाला की, “आम्ही पापाराझींचा आदर करतो. पापाराझी आपल्या जगाचा एक भाग आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो, ते आमच्यासोबत काम करतात. पण अशा गोष्टी घडल्या तर कुठेतरी या गोष्टी तुम्हाला मागे ढकलतात. जेव्हा कोणी तुमच्याशी असे वागते तेव्हा तुम्हाला घृणास्पद वाटते.” या संपूर्ण घटनेत रणबीर कपूर व्यतिरिक्त आलिया भट्टला अर्जुन कपूर, सोनम कपूर, जान्हवी कपूर, करण जोहर आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळाला आहे.

https://youtu.be/SbElFGzZU8I