संज्या राऊत म्हणतो डोक्याला बंदूक लावली तरी वाकणार नाही, पण… ; पवार-मोदी भेटीवरून राणेंचे टीकास्त्र

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नुकतीच दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Sharad Pawar Pm Modi Meet) भेट घेतली. खासदार संजय राऊत (Ed Raid on Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, बारा आमदरांच्या नियुक्तीचा मुद्दा आणि लक्षद्वीपच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई चुकीची आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची काय गरज होती? असा सवाल करत मोदींकडे पवारांनी या कारवाईची तक्रार केली. दरम्यान, या भेटीनंतर आता अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून भाजपने या मुद्द्यावरून टीका केली आहे.

दरम्यान, या भेटीवर भाजपनेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, संज्या राऊत म्हणतो डोक्याला बंदूक लावली तरी वाकणार नाही, पण स्वतःसाठी पवार साहेबांना मोदी साहेबांचे पाय पकडायला पाठवणार. पवारसाहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेतून अजून किती वेळा पडणार आहात. असं राणे यांनी म्हटले आहे.