Suryakumar Yadav | सूर्यकुमारच्या स्वीप शॉटने राशीदला फुटला घाम, तीन चौकार मारल्यानंतर म्हणाला, “माझ्यावर दया कर..”

Suryakumar Yadav | टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरुवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. टीम इंडियाने सुपर-8 फेरीत 47 धावांनी विजय मिळवत विजयी सुरुवात केली. या सामन्यात सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी मॅचविनर ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर भारताने 49 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर सूर्याने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी 60 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

सूर्या बॅटिंगला (Suryakumar Yadav) आला तेव्हा टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. अफगाणिस्तानचा कर्णधार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानने पंतला एलबीडब्ल्यूनंतर पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. सूर्यकुमार क्रीझवर आल्यावर त्याने रशीदच्या चेंडूवर काही स्वीप शॉट्स मारून धावा केल्या. अशा स्थितीत रशीद त्याच्याकडे आला आणि गंमतीने त्याला म्हणाला की, चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न करू नको.

खरे तर सूर्यकुमार मैदानावर येताच अफगाणिस्तानच्या या अनुभवी फिरकीपटूच्या चेंडूवर त्याने तीन चौकार लगावले. यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. आयसीसीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. रशीदच्या चेंडूवर स्वीपवर सूर्या खूप धावा करताना दिसत आहे. इतकेच नाही तर सूर्यकुमारने हे केल्यावर रशीद चिडलेलाही दिसत आहे. या सामन्यात सूर्यकुमारने 28 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. याशिवाय हार्दिक पांड्याने 24 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. तर विराट कोहलीने 24 धावांची तर ऋषभ पंतने 20 धावांची खेळी खेळली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like