Breaking : राणा दाम्पत्याला अटक, आजची रात्र खार पोलीस ठाण्यात जाणार

मुंबई: राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात दिवसभर राडा पाहायला मिळाला. या संपूर्ण वादावरुन राजकारण ढवळून निघालं. या वादानंतर अखेर राणा दाम्पत्याला (Navneet Rana and ravi rana) खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे (Disrupting the peace of the society) असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

एखादं प्रक्षोभक वक्तव्य करुन जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण केलं जात असेल हे कलम लावलं जातं. या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नसल्याने आरोपीला न्यायालयासमोर हजर करावं लागतं. पोलीस कस्टडी हवी असल्यास तशी मागणी पोलीस करु शकतात.