तारीख ठरली! राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार

अमरावती – आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांचा ‘मातोश्री’ (Matoshree) समोर हनुमान चालिसा (hanuman Chalisa) पठण करण्याचा मुहूर्त ठरला आहे. राणा दाम्पत्य आता २२ एप्रिल रोजी मुंबईत जाणार असून २३ एप्रिलला ते हनुमान चालिसा पठण करणार आहेत. रवी राणा त्यांच्या 500 हून अधिक कार्यकर्त्यांसोबत मातोश्री समोर जाणार आहेत आणि हनुमान चालिसा गाणार आहे. त्यामुळे आता शिवसेना (Shivsena) आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.

याबद्दल बोलताना रवी राणा म्हणाले की, हनुमान जयंतीच्या दिवशी मी उद्धव ठाकरेंना आवाहन केलं होतं की महाराष्ट्रात जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला ग्रहण लागलं होतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं श्रद्धास्थान मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करा. पण हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्यांनी हे पठण केलं नाही. त्यामुळे २२ एप्रिलला आम्ही निघणार आहोत .

आम्ही मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचू. ज्याप्रमाणे वारी शांततेत निघते, त्याप्रमाणे आम्ही शांततेत हे पठण करणार आहोत. कोणताही गोंधळ होणार नाही. शांततापूर्वक आम्ही हनुमान चालिसा वाचून महाराष्ट्राच्या शांतीसाठी प्रार्थना करू.असं राणा यांनी म्हटले आहे.