पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नेत्याला अखेर उमेदवारी जाहीर

Pune Bypoll Election: कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. यानंतर काँग्रेसही लवकरच त्यांच्या उमेदवारांची नावे देईल अशी चर्चा सुरू होती. आता काँग्रेसने देखील त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का देण्यासाठी काँग्रेसने कसब्यातून  काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.   काँग्रेसपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, धंगेकर,अविनाश बागवे, बाळासाहेब दाभेकर आणि रोहित टिळक (Arvind Shinde, Dhangekar, Avinash Bagwe, Balasaheb Dabhekar and Rohit Tilak) यांची नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसने धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.