बापट मैदानात उतरल्याने कसब्यातील वारं फिरलं ? धंगेकर गेले थेट पवारांच्या भेटीला

 पुणे : कसबा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भारतीय जनता पक्षातील सर्वच नेते मंडळींनी पुण्यात ठाण मांडले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न देखील केले जात आहे. यातच काल खासदार गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आजारी असताना सुद्धा बापट मैदानात उतरल्याने कसब्यातील वारं फिरल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नसले तरीही निवडणूकीबाबत महत्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.