पत्नीपाठोपाठ रवींद्र जडेजाचाही राजकारणात एन्ट्री, बनला भाजपचा प्राथमिक सदस्य | Ravindra Jadeja Politics

पत्नीपाठोपाठ रवींद्र जडेजाचाही राजकारणात एन्ट्री, बनला भाजपचा प्राथमिक सदस्य | Ravindra Jadeja Politics

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja Politics) राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. जडेजाने नुकतीच 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja Politics) पत्नी रिवाबासोबत अनेकदा प्रचार केला आहे. निवडणुकीदरम्यान तो पत्नी रिवाबासोबत भाजपचा प्रचार करताना दिसला होता. त्याने अनेक रोड शोही केले. जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. आता रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. रिवाबाने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने सांगितले की रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य झाला आहेत. टी20 विश्वचषक 2024 नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

जडेजाने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड चांगला आहे. जडेजाने टी20 विश्वचषक 2024 नंतर टी20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जडेजाने भारतासाठी 74 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत 515 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 54 विकेट्सही घेतल्या आहेत. जडेजाची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 3 बळी. जडेजा अजूनही भारताकडून एकदिवसीय आणि कसोटी खेळणार आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
शाहरुख खान बनला सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता, जाणून घ्या त्याने किती कोटी दिले | Shah Rukh Khan

शाहरुख खान बनला सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता, जाणून घ्या त्याने किती कोटी दिले | Shah Rukh Khan

Next Post
वाढवण प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला मिळणार बूस्टर, अर्थव्यवस्थेला मिळणार गती | Maharashtra Economy

वाढवण प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला मिळणार बूस्टर, अर्थव्यवस्थेला मिळणार गती | Maharashtra Economy

Related Posts
Ujwal Nikam | महायुतीचे उमेदवार अँड. उज्वल निकम यांच्या सांताक्रूझ येथील प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद

Ujwal Nikam | महायुतीचे उमेदवार अँड. उज्वल निकम यांच्या सांताक्रूझ येथील प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अँड. उज्वल निकम (Ujwal Nikam) यांची निवडणूक प्रचार फेरी सांताक्रूझ परिसरात…
Read More
प्रमोद सावंत

‘जनतेने मला स्वीकारले याचा आनंद आहे; गोव्याच्या विकासासाठी जे काही शक्य आहे ते मी करेन’

पणजी – भारतीय जनता पार्टीनं काल उत्तराखंड आणि गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नावं जाहीर केली. पुष्कर सिंह धामी यांची…
Read More
सरकारचे इतके विभाग, ते नक्की काय करतात? राज ठाकरेंनी काढले महायुतीच्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे

सरकारचे इतके विभाग, ते नक्की काय करतात? राज ठाकरेंनी काढले महायुतीच्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे

Raj Thackeray| मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी…
Read More