RCB playoffs | आरसीबीच्या विजयानंतर भावूक झाली अनुष्का शर्मा, चाहत्यांनी पहिल्यांदाच पाहिलं असं दृश्य!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने चमत्कार करून आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये (RCB playoffs) स्थान मिळवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या या विजयानंतर फलंदाज विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा खूप भावूक झाली. अनुष्का शर्माच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि चाहत्यांनी असे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा 27 धावांनी पराभव केला.

प्लेऑफमध्ये (RCB playoffs) जाण्यासाठी, आरसीबीला चेन्नई सुपर किंग्जचा 18 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभव करावा लागणार होता. 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला आरसीबीने 20 षटकांत 191/7 या धावसंख्येवर रोखले. चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव करून आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरताच अनुष्का शर्माची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

अनुष्का शर्माची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे
आऱसीबीच्या विजयानंतर स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा खूप भावूक झाले. विजयाचा आनंद साजरा करताना विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने टाळ्या वाजवल्या, त्यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. कॅमेरामनने हा अतिशय खास क्षण लगेच आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. अनुष्का शर्माची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशक्य शक्य केले
आरसीबीने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. आरसीबीसाठी आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणे एका चमत्कारापेक्षा कमी नव्हते, कारण या संघाने पहिल्या 8 पैकी 7 सामने गमावले होते. आरसीबीने तरीही हार मानली नाही आणि त्यांचे पुढील सलग 6 सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यामध्ये आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीची मोठी भूमिका आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएल 2024 च्या 14 सामन्यांमध्ये 64.36 च्या सरासरीने 708 धावा केल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप