Ajit Doval | देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची पुनर्नियुक्ती

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल  (Ajit Doval) यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली असून, डॉ. पी. के. मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं या नियुक्त्यांना काल मंजुरी दिली.

माजी पोलिस अधिकारी डोवाल (Ajit Doval) आणि माजी प्रशासकीय अधिकारी मिश्रा यांचा कार्यकाल पंतप्रधानांच्या कार्यकाळात किंवा पुढील आदेशापर्यंत कायम राहातील असं कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. डोवाल यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेटही घेतली.

नियुक्ती समितीनं पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी अमित खरे आणि तरुण कपूर यांच्या नियुक्त्यांनाही मंजुरी दिली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची करारान्वये दोन वर्षांसाठी नेमणूक झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like