जिल्हा पोलिसांच्या मध्यस्थीने आर्ट ऑफ लिविंग व संभाजी ब्रिगेडमध्ये समेट

तुळजापूर| आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांच्या तुळजापूर येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. श्री श्री रविशंकर यांच्या वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असलेल्या विधानावर आक्षेप नोंदवत संभाजी ब्रिगेड या संघटनेने ही भूमिका घेतली होती.

गुरुवार, दि. 02 फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथे आर्ट ऑफ लिविंगच्या कार्यक्रमासाठी श्री श्री रविशंकर हे आले असता जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाच्या गोपनीय शाखेने संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या पदाधिकारी आणि श्री श्री रविशंकर यांची भेट घडवून आणली. श्री श्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागणीनुसार त्यांच्या वेबसाईटवरील ते विधान हटविण्याचे मान्य केले. आर्ट ऑफ लिविंग आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये जिल्हा पोलीस दलाने मध्यस्थी करीत समेट घडवून आणल्यामुळे हा श्री श्री रविशंकर यांचा तुळजापूर येथील कार्यक्रम शांततेत पार पडला.