स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी पद भरती

लातूर : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी कळविल्यानुसार सदर बँकेमध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात एकूण 7425 सुरक्षा रक्षक (Bank Guard) या पदासाठी नोंदणीकृत पात्र माजी सैनिकांची नांवे पुरस्कृत करून संबधित प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने सदर पदाकरिता पात्र व इच्छूक सैन्यातील सेवानिवृत्त् झालेल्या व खालील पात्रता पूर्ण करत असलेल्या लातुर जिल्हयातील माजी सैनिकांनी लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत दिनांक 11 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपल्या डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, इम्पलॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपले नांव नोंदणकृत असलेबाबत खात्री करणेसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातुर यांनी कळविले आहे.

वय, शिक्षण, सैन्य दलातील सेवा, सैन्य दलातील हूद्दा, सैन्य दलातील चारित्र्य व Medical Cat पूढील प्रमाणे आहे. 01 ऑक्टोबर 2021 ला 45 वर्षापेक्षा कमी, कमीत कमी 8 वी पास पण 12 वी पास नसावा, कमीत कमी 15 वर्षे, जास्तीत जास्त Hav and below, कमीत कमी GOOD व AYE/
SHAPE 1 असे आहे.