वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये रेड्यांची शिंग पुरलेत’; राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये रेड्यांची शिंग पुरलेत'; राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde | राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईच्या मलबार हिल परिसरातल वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. वर्षा बंगल्याच्या हिरवळीखाली गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरातील मंतरलेली रेड्यांची शिंग पुरली गेली आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता उत्तर देताना ते म्हणाले, या गोष्टींचा सर्वात जास्त अनुभव त्यांना आहे. याच्यातील जास्त अनुभव त्यांना असल्यामुळे तुम्ही त्यांनाच त्याबद्दल विचारा खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते, त्यांच्यावर बोलण्याची आवश्कता मला वाटतं नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा करत भाजपवर निशाणा साधला. “भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये गुप्तपणे खोदकाम करून गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरातील बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरली गेली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही, पण वर्षा बंगल्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये यासंदर्भात कुजबुज सुरू आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

यासोबतच, “जो कोणी दुसरा मुख्यमंत्री होईल, त्याचे पद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली शिंग पुरण्यात आली आहेत,” असा दावाही त्यांनी केला. त्याच संदर्भात “देवेंद्र फडणवीस अधिकृत मुख्यमंत्रिपदावर असले तरी वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत,” असा उल्लेख करत, त्यामागचे कारण महाराष्ट्राला समजले पाहिजे, असेही ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला

आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करा- Rupali Chakankar

नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं अन् माजी सभापतीला निर्दयीपणे संपवलं

Previous Post
आम्ही शांत बसलोत म्हणजे आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका; मुंडेंचा दमानियांना इशारा

आम्ही शांत बसलोत म्हणजे आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका; मुंडेंचा दमानियांना इशारा

Next Post
राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लग्नाची घंटा वाजणार, जाणून घ्या कोण आहेत वधू आणि वर

राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लग्नाची घंटा वाजणार, जाणून घ्या कोण आहेत वधू आणि वर

Related Posts

मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी गुलामगिरीचे लक्षण; महात्मा गांधींचा 1937 चा लेख व्हायरल

नवी दिल्ली – ज्ञानवापी ते मथुरेपर्यंत शाही ईदगाहचे प्रकरण चर्चेत आहे. एकीकडे हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे आणि…
Read More
Bank Of Baroda

बँक ऑफ बडोदाने कर्जे महाग केली; जाणून घ्या नेमका काय होणार परिणाम

Bank Of Baroda Hikes Rates : नवीन वर्षातही महागड्या कर्जाची प्रक्रिया थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सार्वजनिक क्षेत्रातील…
Read More
Rain

राज्यात पावसाची दमदार हजेरी; धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

पुणे – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये…
Read More