Shivarai Kulkarni | बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बडनेरा व आसपासच्या परिसरात आठ आठ दिवस नळ येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून बडनेरा व अमरावती शहरातील बडनेरा लगतच्या भागात नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांकडे केली.
शिवराय कुळकर्णी ( Shivarai Kulkarni) यांच्या नेतृत्वात बडनेरा व आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी आज सविस्तर चर्चा केली. जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता श्री सोलंकी, उपअभियंता लेवरकर, आजने आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसरातील सर्व समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जुन्या वस्तीतील काही भागात आणि नव्या वस्तीतील बहुतांश भागांमध्ये नळाचा प्रश्न गंभीर बनला असून आठ आठ दिवस नळ येत नाहीत. लोक त्रस्त झाले असून आहेत. किमान एक दिवसाआड का असेना पण नियोजित वेळेवर आणि नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. कुळकर्णी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या बिकट प्रश्ना विषयी त्यांनाही अवगत केले. त्यांनीही अधिकाऱ्यांना याप्रकरणी तात्काळ तोडगा काढावा अशा स्पष्ट सूचना फोनवरून दिलेल्या आहेत.
या शिष्टमंडळात राजेश मन्नालाल शर्मा, तुषार रमेश अंभोरे, स्वप्निल धोटे, अनिल भारती, निलेश पवार, गौरव बांते, प्रमोद पोकळे, अश्विन नागरेचा, रवी बनसोड, देवडा यांचा प्रामुख्याने समावेश होता.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा”
कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस – Manisha Kayande
भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये – Chhagan Bhujbal