दाढीवाला काशिफ खान आणि वानखेडे यांचे नाते काय ? – नवाब मलिक

दाढीवाला काशिफ खान आणि वानखेडे यांचे नाते काय ? – नवाब मलिक

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील दाढीवाल्या व्यक्तीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याची माहितीही त्यांनी आज मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. त्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असे असून हा मोठा ड्रग पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला. शिवाय हा व्यक्ती अवैध सेक्स रॅकेट, पॉर्नोग्राफी चालवत असल्याचे ते म्हणाले. काशिफ खान हा समीर वानखेडेचा चांगला मित्र आहे. अनेक अधिकाऱ्यांनी काशिफ खानवर कारवाईचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्याचे काम वानखेडे यांनी केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, वानखेडे यांच्या परिवाराने मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे पत्र लिहिले. यावर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते पुढे आले आहेत. मात्र राक्षसाचा जीव पोपटात आहे, या कथेचे उदाहरण देत मलिक यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला. भाजपसारख्या राक्षसी विचारांच्या लोकांना आता चिंता वाटू लागली आहे की, जर पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील, अस मलिक म्हणाले आहेत.

महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी वानखेडे यांनी कारवाईची मालिका सुरु केली, ज्यामध्ये निशाणा साधून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. योगी सरकार आपल्या राज्यात फिल्म सिटी घेऊन जाण्याचा विचार करत आहेत. मात्र हे बॉलिवूड उभारण्यासाठी अनेक मराठी दिग्गज कलाकारांनी योगदान दिले असल्याचे मलिक यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o

Previous Post
हा पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील, मलिकांचा वानखेडेंवर हल्लाबोल

हा पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील, मलिकांचा वानखेडेंवर हल्लाबोल

Next Post
एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणाचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी होतोय - जयंत पाटील

एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणाचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी होतोय – जयंत पाटील

Related Posts
अमित शाह

कोविड १९ ची लाट ओसरताच CAA लागू होणार – अमित शहा

सिलीगुडी – सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी महत्वाचं…
Read More
Emraan Hashmi | चित्रपटांमध्ये लिपलॉक किंवा इंटिमेट सीन कसे शूट केले जातात? इमरान हाश्मीचा मोठा खुलासा

Emraan Hashmi | चित्रपटांमध्ये लिपलॉक किंवा इंटिमेट सीन कसे शूट केले जातात? इमरान हाश्मीचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने (Emraan Hashmi) अनेक जॉनरचे चित्रपट केले आहेत. त्याने त्याच्या सुरुवातीच्या सर्व चित्रपटांमध्ये चुंबन दृश्ये…
Read More
मराठा आरक्षणावर ट्रिपल इंजिन खोके सरकार काय मार्ग काढणार आहे हे पाहावं लागले - सुळे

मराठा आरक्षणावर ट्रिपल इंजिन खोके सरकार काय मार्ग काढणार आहे हे पाहावं लागले – सुळे

supriya sule – ४० दिवसांचा अल्टिमेटम संपून देखील आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेऊ शकलं नाही. म्हणून जरांगे यांनी पुन्हा…
Read More