पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर ‘या’ गोष्टी करत मिटवू शकता वाद, नातेही आणखी घट्ट बनेल!

Relationship Tips: नात्यात प्रेमासोबत वाद होणेही आवश्यक असते, असे म्हणतात. मात्र या वादाचे रुपांतर मारामारीत होऊ नये. अनेकवेळा भांडणाच्या वेळी लोक एकमेकांना त्या गोष्टी बोलतात, ज्या सामान्यपणे सांगण्यास ते कचरतात, मग भांडणे ही काही वाईट गोष्ट नाही कारण जाणूनबुजून किंवा नकळत तुम्ही तुमचा संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता. जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमचे तुमच्या पती किंवा पत्नीशी एखाद्या गोष्टीवरून भांडण झाले असेल, ज्यामुळे अनेक दिवसांपासून संभाषण थांबले असेल, तर येथे दिलेल्या कल्पना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

आवडत्या डिशची जादू
भांडणानंतर संभाषण सुरू करण्यासाठी तुम्ही जोडीदाराच्या आवडीची डिश तयार करू शकता. राग आला किंवा तणावात असल्यास आपल्या आवडीचा एखादा खाद्यपदार्थ खाल्ला की बरं वाटतं. अगदी तसंच जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीचा खाद्यपदार्थ बनवून किंवा बाहेरुन मागवून त्याला खायला दिला तर त्याचा राग शांत होणार हे नक्की. हा विचार कधीही चुकत नाही. पण हो, लक्षात ठेवा जेवताना भूतकाळावर चर्चा करू नका, नाहीतर संभाषण बिघडू शकते.

पत्र लिहा
वाद संपवण्यासाठी तुम्ही ही कल्पना देखील वापरून पाहू शकता. पेन घ्या आणि आपल्या भावना कागदावर मांडा. या कल्पनेची मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही रागावलात तरीही, एकदा का तुम्ही लिहायला सुरुवात केली की तुमचा मूड हलका होऊ लागतो. यासोबतच तुमच्या चुकाही दिसून येतील. प्रयत्न करू शकता.

सॉरी कार्ड द्या
बर्याच लोकांना सरप्राइज आवजतात. मेंदू वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. नव्या पद्धतीने विचार करायला लागतो. त्यामुळे भांडण संपवण्यासाठी तुम्ही कार्ड बनवून तुमच्या जोडीदाराला देऊ शकता. तुम्ही त्यांच्या आवडीचे गाणे गाऊ शकता. ही कल्पना खूप चांगली कार्य करते.

अहंकार बाजूला ठेवा
जर तुम्हाला भांडण वाढवायचे नसेल आणि दोन-तीन दिवसांपासून बंद संवाद सुरू करायचा असेल तर तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि सॉरी म्हणा. माफी मागितल्याने तुम्ही छोटे होत नाही याउलट हा फक्त तुमचा नम्र स्वभाव दर्शवते.

(सूचना- वरील माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)