पालकांच्या तक्रार निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

पालकांच्या तक्रार निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

पुणे : राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गेली दीड वर्ष बंद असणारे शाळांचे दरवाजे अखेर खुले झाले आहेत. विद्यार्थी प्रचंड उत्सुकतेने आज शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे निंदनीय आहे. शाळांच्या कमी झालेल्या शुल्काच्या आकारणी बाबत योग्य नियमावली नसल्याने त्यावर अंमलबजावणी होऊ शकली नाही. योग्य नियमावली नसल्याने आज शाळा प्रशासन याचा गैरफायदा घेत आहेत. फी न भरल्याने पुण्यातील एका शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारून गेटवरती उभं करण्यात आलं, या शाळेवर तातडीने कारवाई करावी तसेच पालकांच्या तक्रार निवारणासाठी रक विशेष हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी युवसेनेच्या कल्पेश यादव यांनी केली होती.

या मागणी नंतर प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी हेल्पलाईन सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश आज विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.

यादव म्हणाले, आज पुण्यात शाळांचा पहिला दिवस उजडताच विद्यार्थ्यांवर फी न भरल्याने गेटवर उभे राहण्याची वेळ आली. ही बाब निंदनीय आहे. यामुळे सर्वच विद्यार्थी-पालकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शाळा प्रशासनाची ही मनमानी अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टाकू शकते, तसेच पालकांना शिक्षण आणि विद्यार्थ्यांची जडणघडण याबाबतीत असणारी आस्था कायमची नष्ट होण्यास हे कारणीभूत ठरू शकतं.

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, तसेच पालकांसमोरील विविध अडचणी शिक्षण विभागापर्यंत पोचविण्यासाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक चालू करण्यात यावा. अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीवर सकारात्मक उत्तर देत टेमकर यांनी शिक्षण हित जपत ही हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याचा नक्कीच शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि खाजगी शाळांची मनमानी थांबण्यासाठी उपयोग होईल. असे देखील यादव यांनी सांगितले.

हे ही पहा :

https://www.youtube.com/watch?v=lbCAx3D6bzQ

Previous Post
मनसेने काढली खड्डेमय महामार्गाची अंत्ययात्रा

मनसेने काढली खड्डेमय महामार्गाची अंत्ययात्रा

Next Post
sunil kedar

देशाला अभिमान वाटेल असे क्रीडा विद्यापीठ उभारणार – सुनिल केदार

Related Posts
Ravindra Jadeja | धक्कादायक! गेल्या ५ वर्षांपासून एकटेच राहतायत रविंद्र जडेजाचे वडील, पत्नीमुळे तुटले वडील आणि मुलाचे नाते

Ravindra Jadeja | धक्कादायक! गेल्या ५ वर्षांपासून एकटेच राहतायत रविंद्र जडेजाचे वडील, पत्नीमुळे तुटले वडील आणि मुलाचे नाते

Ravindra Jadeja Exposed : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. भारताचा स्टार अष्टपैलू…
Read More
सचिन सावंत

भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपाकडेच आहे – सावंत

Mumbai – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार…
Read More

शिरूर लोकसभा मतदारसंघात अजितदादांचा बोलबाला; बहुतांश आमदार अजित पवारांच्या सोबत

पुणे – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित…
Read More