घरबसल्या असे काढा पॅन कार्ड

पॅन कार्ड आर्थिक व्यवहार करताना खूप गरजेचे आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड बरोबरच  पॅन कार्ड देखील मागितले जाते. जेव्हा तुम्ही मोठे व्यवहार करता तेव्हा तुम्हाला तुमचा पॅन नंबर देखील द्यावा लागतो. पॅन कार्ड काढणे तसे जिकरीचे काम वाटते, त्यामुळे आपण अनेकदा एजंटद्वारे पॅन कार्ड काढतो.त्यासाठी आपण अगदी दुप्पट-तिप्पट पैसे मोजतो. पण आजच्या लेखात आपण घर बसल्या तुम्ही कसे पॅन कार्ड काढू शकता हे पाहणार आहोत.

सर्वात प्रथम https://www.pan.utiitsl.com/ या पॅन कार्ड काढण्यासाठी असलेल्या वेबसाईटवर जा.तिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
पहिला पर्याय दिसतो, पॅन कार्ड फॉर इंडियन सिटीजन, म्हणजे भारतीय नागरिक असाल तर यावर क्लीक करा.
दूसरा पर्याय आहे, परदेशी नागरिक असाल तर, परदेशी नागरिक देखील पॅन कार्ड काढू शकतात.

 

तिसरा पर्याय आहे फॉर एनी चेंज म्हणजे काय जर तुमच्याकडे आधीचे पॅन कार्ड असेल आणि त्यात काही बदल करायचा असेल तर
चौथा पर्याय आहे ई पॅनसाठी, ई पॅनविषयी काही अडचण असेल तर
पाचवा पर्याय पॅन कार्ड रिप्रिंट करायचे असेल तर अनेकदा पॅन कार्ड हरवते अशा वेळेस हा पर्याय वापरावा
सहावा  पर्याय आहे फॅसिलिटी फॉर अॅड्रेस अपडेट इन पॅन डेटा बेस म्हणजे तुम्हाला तुमचा राहण्याचा पत्ता जर बदलायचा असेल तर
सातवा  पर्याय ट्रॅक पॅन कार्ड, जर तुम्ही आधीच पॅन कार्डसाठी अर्ज केला असेल तर ते कुठं पर्यत आले आहे हे पाहण्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

चला तर मग आता पाहू कसं काढायचं पॅन कार्ड
पॅन कार्ड काढण्यासाठी 107 रुपये इतकी फी आहे, ही फी तुम्ही विविध पर्याय वापरुन भरू शकता. जसे की नेट बँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड

पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी चार पद्धती आहेत.
सर्वात प्रथम पॅन कार्ड फॉर इंडियन सिटीजन या पर्यायवर क्लिक करा
त्या नंतर तुम्हाला तिथे तीन पर्याय दिसतील
अप्लाय फॉर न्यू पॅन कार्ड हा पहिला पर्याय निवडा.

जर तुम्ही आधार कार्ड वापरुन पॅन कार्ड काढणार असाल तर e kyc या दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.त्या नंतर समोर एक फॉम येईल त्यातील सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि फॉर्म सबमिट करा.फॉर्म सबमिट केल्यानंतर ई पेमेंट करा आणि त्या नंतर तुम्हाला एक पावती मिळेल ती आपण डाऊनलोड करून त्यात एक नंबर आलेला असतो, तो नंबर आपले कार्ड बनले आहे की नाही हे पाहण्यासाठी उपयुक्त असतो.तुम्ही ज्या वेबसाईटवरुन पॅन कार्ड काढले आहे, तेथेच तुम्ही तुमचे पॅन कार्ड बनवून झाले आहे का? हे पाहू शकता.ऑनलाईन पॅन कार्ड काढताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नीट द्यावा.कारण तुमचे पॅन कार्ड तुमच्या ईमेलवर येते.