७४ वा प्रजासत्ताक दिन : पुण्यात ३७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारली ५ महापुरुषांची मानवी प्रतिकृती

पुणे – गेल्या ३ वर्षाच्या यशस्वी परंपरेला अनुसरून यंदाही झील एज्युकेशन सोसायटीने (Zeal Education Society) साकारला अनोखा विक्रम. झील एज्युकेशन सोसायटी, नऱ्हे ही संस्था गेली २६ वर्षे शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना दिली.

हा उपक्रम २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता संस्थेच्या प्रांगणात साकारला गेला. या उपक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने संस्थेचे सचिव डॉ. जयेश काटकर यांच्या हस्ते झाली. संस्थेचे सचिव डॉ. जयेश काटकर (Dr. Jayesh Katkar) यांनी तरुणांना सामाजिक भान आणि देशप्रेम जपण्याचे आवाहन केले.

झील एज्युकेशन सोसायटी नेहमीच अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्यात अग्रेसर राहिली आहे. या उपक्रमामध्ये संस्थेचे ३७०० हून अधिक विदयार्थी सहभागी झाले होते. ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाद्वारे एकता आणि शांतता हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवण्याचा उद्देश सफल झाला आहे.

या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी (Netaji Subhash Chandra Bose, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, Maulana Abul Kalam Azad, Lokmanya Bal Gangadhar Tilak and Father of the Nation Mahatma Gandhi) या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना दिली गेली.

या उपक्रमाला संस्थेचे संस्थापक  संभाजी काटकर, शैक्षणिक , ऍडमिशन प्रवेश आणि प्रशासन उद्धव शिद यांचे मार्गदर्शन लाभले.  प्रा.डॉ. ऋषिकेश काकांडीकर ( हेड
झील ग्रुप ऑफ मैनेजमेंट इंस्टिट्यूटस) , प्रा. अयूब तांबोळी ( प्राचार्य झील पॉलिटेक्निक ) , डॉ. अजित काटे ( प्राचार्य ,झील इंजीनिरिंग कॉलेज), प्रा. निलेश मगर (प्राचार्य आय. टी. आय ) , प्रा. विजय शिंदे ( प्राचार्य ज्यू. कॉलेज ) यांनी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.