ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणूक रिंगणात रिपब्लिकन पक्ष

नागालँड;त्रिपुरा आणि मेघालयात केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले प्रचार दौरा 

मुंबई  –  ईशान्य भारतातील नागालँड; मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला असून या तीन ही राज्यांच्या विधानसभा  निवडणूकीच्या रिंगणात रिपब्लिकन पक्ष उतरला असून उद्या दि.12 आणि 13 फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री  रामदास आठवले हे त्रिपुरा राज्यात आगरतळा येथे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

आगरतळा येथे रिपाइंच्या  जाहीर प्रचार सभेला रामदास आठवले संबोधित करणार आहेत. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत रिपाइं( आठवले) पक्षाचे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपाइंचे 8 उमेदवार निवडणूक लढत असून मेघालय विधानसभा निकडणुकीतही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) चे  8 उमेदवार निवडणुकीत लढत देत आहेत.

ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकित रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या  प्रचारासाठी ना.रामदास आठवले यांचा दौरा रिपाइं प्रसिद्धीविभागातर्फे जाहीर करण्यात आला असून उद्या दि12 आणि 13 फेब्रुवारी रोजी त्रिपुरा राज्यात आगरतळा येथे त्यानंतर दि.17 आणि 18 फेब्रुवारी रोजी नागालँड राज्यात दिमापूर येथे त्यानंतर दि.23 आणि 24 फेब्रुवारी रोजी मेघालय येथे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रामदास आठवले दौरा करणार आहेत.