सिद्धार्थ नगर मधील रहिवाशांना मिळणार पक्की घरे – जगदीश मुळीक

नगर रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या रामवाडी मधील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी धारकांना एसआर अंतर्गत घरे देण्याचे महापालिका आयुक्तानी मान्य केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून खुळेवाडी ट्रांनझिट कॅम्पमध्ये रहाणाऱ्या नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दिली.

मुळीक म्हणाले, सिद्धार्थनगर वासियांची घरे 2007 मध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित झाली होती. येथील रहिवाशांना खुळेवाडी येथील तात्पुरत्या स्वरूपात रहाण्यासाठी जागा दिली होती. मात्र त्याठिकाणी रहाणाऱ्या राहिवाशांना कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. असुविधेमुळे नागरिक त्रस्त होते. रहिवाशाना पक्की घरे मिळण्यासाठी जगदीश मुळीक, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी नागरिकांसासह एसआरएचे अधिकारी, महापालिका आयुक्त यांचे कडे वारंवार पत्र व्यवहार करून वारंवार बैठाका घेतल्या होत्या. एसआरएच्या अधिका-यांनी महापालिकेने सदर राहिवाशांची सोय करावी असे पत्र दिल्यानंतर महापालिका आयुक्त, मालमता विभागाचे उपायुक्त यांचेशी बैठक घेऊन नागरिकांना विमाननगर, रामवाडी येथील एसआरए योजनेत घरे मिळावीत अशी मागणी बैठकीत केली होती. आयुक्ताच्या आदेशा नंतर मालमत्ता विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी विमाननगर व रामवाडी येथील एसआरए इमारती मधील शिल्लक असणारी घरे खुळेवाडी येथे ट्रांनजीट कॅम्प मध्ये रहाणाऱ्या राहिवाशांना  देण्याचे मंजूर केल्याचे पत्र दिले आहे.

जगदीश मुळीक म्हणाले, आपण याबाबत एसआरए तसेच महापालिका अधिकारी यांच्याकडे टेबल टू टेबल असा पाठपुरावा केल्यामुळे आज खुळेवाडी येथे स्थलांतर झालेल्या राहिवाशाना पक्की घरे देण्याचे मंजूर झाले आहे.आयुक्तानी घेतलेल्या या निर्णयामुळे सिद्धार्थनगर मधील रहिवाशाना पक्की घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सिद्धार्थ नगर मधील राहिवाशा मध्ये आनंदाचे वातावरण असून राहिवाशानी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, डॉ सिद्धार्थ धेंडे यांच्यासह अधिकाऱ्यांचे आभार मानले.