धक्कादायक! पाण्याच्या एका बाटलीत टॉयलेट सीटपेक्षा ४०,००० पट जास्त किटाणू, अभ्यासातून खुलासा

अनेक लोक पाण्याची बाटली (Water Bottle) किती वेळा वापरतात हे माहित नाही. खूप कमी लोक आहेत जे वापरल्यानंतर लगेच बाटल्या फेकतात. पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? आणि त्यामुळे तुम्हाला किती आजार होऊ शकतात? वास्तविक हे आम्ही म्हणत नसून, एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, पुन्हा वापरता येण्याजोग्या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा 40,000 पट जास्त बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही बऱ्याच काळापासून तीच बाटली वापरत असाल तर तुम्ही आता सावधगिरी बाळगली पाहिजे.

अमेरिका-आधारित WaterfilterGuru.com च्या संशोधकांच्या पथकाने पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटल्यांच्या स्वच्छतेची तपासणी केली. त्यांनी बाटलीचे सर्व भाग तीनदा तपासले. संशोधनानुसार, बाटलीवर दोन प्रकारचे बॅक्टेरिया आढळून आले, ज्यात ग्राम-नकारात्मक बॅक्टेरिया आणि बॅसिलस बॅक्टेरिया यांचा समावेश आहे. संशोधकांनी स्पष्ट केले की ग्राम-नकारात्मक जीवाणू विविध प्रकारच्या संसर्गास कारणीभूत आहेत. तर बॅसिलस बॅक्टेरियामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. या संशोधनात बाटल्यांच्या स्वच्छतेची तुलना घरातील वस्तूंशी करण्यात आली आणि बाटल्यांमध्ये किचन सिंकपेक्षा दुप्पट जंतू असल्याचे आढळून आले.

पाण्याची बाटवी पुन्हा वापरणे आरोग्यासाठी धोकादायक!
संगणकाच्या माऊसपेक्षा पाण्याच्या बाटल्यांमध्ये चारपट अधिक बॅक्टेरिया असल्याचेही त्यांनी सांगितले. पाळीव प्राण्यांच्या पाण्याच्या भांड्यापेक्षा पाण्याच्या बाटलीमध्ये 14 पट जास्त जीवाणू असतात. अर्थात हे संशोधन भीतीदायक आहे. कारण मोठ्या संख्येने लोक पाण्याची बाटली अनेक वेळा वापरतात. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. सायमन क्लार्क यांनी सांगितले की, पाण्याच्या बाटलीमध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात असले तरी ते आरोग्यासाठी तितके धोकादायक असल्याचे सिद्ध होत नाही.

गरम पाण्याने बाटली धुवा
क्लार्कने सांगितले की, आजपर्यंत मी कधीही पाण्याच्या बाटलीमुळे आजारी पडल्याचे पाहिले नाही. नळाचे पाणी पिऊनही कोणी आजारी पडल्याचे आढळून आले नाही. क्लार्क म्हणाले की, पाण्याच्या बाटल्या लोकांच्या तोंडात आधीपासूनच असलेल्या बॅक्टेरियामुळे दूषित असतात. संशोधकांनी बाटल्यांचा पुनर्वापर करण्यापूर्वी दिवसातून एकदा तरी साबण आणि गरम पाण्याने धुण्याची शिफारस केली आहे.