सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा अबाधित राखून कार्तिक वारी पूर्वतयारी म्हणून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज घेतला.
कार्तिकी यात्रा पूर्व नियोजनाबाबत जिल्हा नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे, अभिजीत पाटील, पंढरपूर न.पा चे मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वारीच्या परंपरा अबाधित राखून तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेण्यात येईल. यासाठी विविध विभागांनी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावाजिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतला. यामध्ये नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा ,तात्पुरती शौचालय,प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते दुरुस्ती, फवारणी, पार्किंग व्यवस्था, ६५ एकर व नदी पात्रातील वाळवंट स्वच्छता व सुविधेबाबतघा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
तसेच आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी व उपचारासाठी आवश्यक सुविधा, बेडची उपलब्धता ,ऑक्सिजन पुरवठा कोविड केअर सेंटरची उपलब्धता याबाबत आढावा घेतला.
यावेळी पोलीस प्रशासनाकडून सुरक्षिते बाबत करण्यात येणारे नियोजन तसेच अन्न व औषध प्रशासन, पाटबंधारे विभाग ,महावितरण राज्य त्पादन शुल्क , आदी विभागांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संबंधितांना केल्या.
https://youtu.be/GmVj7hqrh5o