क्रिकेटपासून दूर असूनही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने खरेदी केले १५० कोटींचे आलिशान घर

जगभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू त्यांच्या खेळासोबतच लक्झरी लाइफसाठीही ओळखले जातात. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पाँटिंगच्या बाबतीतही असेच आहे. रिकी पाँटिंग (Ricky Ponting) हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. नुकतेच रिकी पाँटिंगने मेलबर्नच्या सर्वात पॉश भागात एका घरासाठी $20 दशलक्ष खर्च केले आहेत. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, हे घर त्याच्या निश्चित किंमतीपेक्षा जास्त रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. या घराची किंमत $20.6 दशलक्ष आहे पण पाँटिंगने (Ricky Ponting Buy New House) ते $20.75 दशलक्षला (भारतीय रुपयांनुसार 150 कोटी) विकत घेतले आहे.

पाँटिंगची आधीच बरीच घरं आहेत
द एजनुसार, पॉन्टिंगने विकत घेतलेले घर 1400 स्क्वेअर मीटरवर आहे आणि हे घर एक ओपन-प्लॅन इनडोअर-आउटडोअर लिव्हिंग रूम आणि आधुनिक स्वयंपाकघर आहे. पाँटिंगचे हे पहिले आलिशान घर नाही. याशिवाय त्याची इतरही अनेक घरे आहेत. 2013 मध्ये, त्याने ब्राइटन बीचजवळ एक घर विकत घेतले, ज्याची किंमत त्यावेळी $ 9.2 दशलक्ष होती. ब्राइटनमधील त्याच्या घराचे नाव ‘गोल्डन माईल’ आहे. घरामध्ये सात शयनकक्ष, आठ स्नानगृहे, एक खाजगी थिएटर आणि समुद्रकिनार्यावर जाण्यासाठी एक खाजगी मार्ग आहे. त्याच्याकडे $3.5 दशलक्ष पोर्टसी हाऊस देखील आहे, जे त्याने 2019 मध्ये खरेदी केले होते.