‘सध्या माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही पण तुमची ताकद मला द्या, परत एकदा आपण जोमाने उभे राहू’

मुंबई  : आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही परंतु तुम्हीची ताकद मला हवी आहे. सध्या तुम्हाला विदाऊट तिकीट प्रवास आपणास सध्या करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी केला आहे. मातोश्री येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करत असताना भाजपासह शिवसेनेतून बंड करून निघालेल्या आमदारांवर टीका केली. तसेच हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हानही दिले.

सध्याच्या घटनेवरून त्यांनी राज्यात कशापद्धतीने घटनेची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, याची माहिती दिली. एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणात असून अरुणाचल प्रदेश सारखा निकाल लागण्याची शक्यता असल्याचे देखील श्री ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे (Shiv Sena Deputy Leader Dr. Neelam Gorhe यांनी बोलताना त्यांचे मन भावुक झाले होते. त्या म्हणाल्या की यापुढे आपण एक जुटीने व ताकतीने काम करायचे आहे. मा. ऊद्धवसाहेबांनी भेट व त्यांनी घेतलेली साद यांनी पुण्याच्या शिवसैनिकांना जिंकले.