लाल सिंह चड्ढाचं प्रमोशन करायला गेली आणि रिंकू राजगुरू ट्रोल झाली 

मुंबई : आमिर खानचा बहुचर्चित सिनेमा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी सिनेमा देशात बॅन केला जावा अशी मागणी केली जात होती. सोशल मीडियावर तर #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाला सपोर्ट करणारे सुद्धा ट्रोल होत आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरू ही देखील आमिरची चाहती असून तिने देखील एक स्पेशल पोस्ट ‘लाल सिंग चड्ढा’साठी  केली होती. पण ही पोस्ट  केल्यानंतर तिला तुफानी ट्रोल करण्यात आलं. काही वेळातच तिच्यावर ही पोस्ट डिलीट करण्याची देखील नामुष्की ओढावली. काहींनी कमेंट केली  होती की आता यानंतर तुझेही चित्रपट Boycott केले जातील. तु कुठे होतीस जेव्हा आमिर हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवत होता?’, अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टवर केल्या होत्या.

दरम्यान रिंकूच्या या पोस्टवर अनेक अशा कमेंट्स आहेत ज्यामध्ये केवळ #BoycottLaalSinghChaddha लिहिण्यात आलं . त्यामुळे आता नेटिझन्सनी कमेंट्स केल्याप्रमाणे रिंकूच्या या पोस्टचा तिच्या आगामी सिनेमांवर परिणाम होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.