किरीट सोमय्यांना शिव्या देणाऱ्या संजय राऊत यांना रोहित पवारांच्या कानपिचक्या; म्हणाले,…

पंढरपूर – ईडीने खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर कारवाई केल्यानंतर ते आक्रमक झाले आहेत. ईडीने (ED ) आपल्यावर कारवाई केली असली तरी, आपण कोणाच्याही बापाला घाबरत नाही. महाविकास आघाडीचे सरकार (MVA) पाडण्यासाठी वेळोवेळी आपल्यावर दबाव टाकला जात होता. या दबावातून ही कारवाई केली गेली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैयांवर खालच्या शब्दात टीका केली. ते म्हणाले, तो येडXX आहे, चुXX आहे. तसेच महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. अशा लोकांना महाराष्ट्रात स्थान नाही. असं म्हणत शिविगाळ केली. यावर राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. परंतु बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे, असा सल्ला ही आमदार पवार यांनी दिला आहे.