Rohit Sharma | मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल 2024 मधून बाहेर झाला आहे. संघाने 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले आहेत. आयपीएलपूर्वीच मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे कमान सोपवली होती. पण हार्दिक काही विशेष करू शकला नाही. मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीनंतर संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माही खूश नाही. आता पुढच्या वर्षी तो मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. खुद्द एमआयचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
रोहितबद्दल (Rohit Sharma) बोलताना मार्क बाउचर म्हणाला, “खरं सांगायचं तर याबद्दल खूप चर्चा होत आहे. आदल्या रात्री मी त्याच्याशी याबद्दल बोललो होतो. मी त्याला विचारले की रोहितचा पुढचा प्लॅन काय आहे? तो मला म्हणाला, “टी20 विश्वचषक आणि तो परिपूर्ण आहे.” माझ्या मते रोहित स्वतःच्या इच्छेचा धनी आहे. पुढील वर्षी मोठा लिलाव होणार आहे. पुढच्या वर्षी काय होणार? हे कोणालाच माहीत नाही. हा हंगाम त्याच्यासाठी चांगला होता. त्याने चांगली सुरुवात केली होती. नेटमध्येही चांगली फलंदाजी केली. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही शतक ठोकले.
158 सामन्यात मुंबईचा कर्णधार असताना रोहित शर्माने 87 सामने जिंकले आहेत तर 67 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या महान कर्णधाराची विजयाची टक्केवारी 55.06 होती. मुंबई संघाने आतापर्यंत जी 5 विजेतेपदे जिंकली आहेत ती देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आली आहेत. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये या अनुभवी खेळाडूने संघाला आयपीएल चॅम्पियन बनवले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप