Champions Trophy 2025 | पाकिस्तान आणि दुबईच्या संयुक्त यजमानपदाखाली १९ तारखेपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला ( Champions Trophy 2025) सुरुवात होत आहे. पण ही सुरुवात होण्यापूर्वी, रोहित शर्माच्या जुन्या मित्राच्या आयुष्यात उलथापालथ झाली आहे. या खेळाडूचे १४ वर्षांचे नाते संपुष्टात आले आणि ते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. या व्यक्तीचे नाव जीन पॉल ड्युमिनी म्हणजेच जेपी ड्युमिनी आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या माजी फलंदाजाचा १४ वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे. सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून त्यांनी ही माहिती दिली. ड्युमिनी आणि त्याची पत्नी स्यू यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्युमिनीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, एकत्र अनेक अद्भुत क्षण घालवल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. “खूप विचार केल्यानंतर, मी आणि स्यूने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला आणि आम्हाला दोन लहान मुली आहेत. सध्या आम्ही बदलाच्या काळातून जात असताना गोपनीयता राखण्यास उत्सुक आहोत. आम्ही मित्र आहोत. आमचे वेगळे होणे मैत्रीपूर्ण निर्णय राहिले आहे,” असे ड्युमिनीने लिहिले.
ड्युमिनी आणि स्यू यांचे २०११ मध्ये लग्न झाले. या लग्नात सुमारे ३०० लोकांना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात मॉर्ने मॉर्केल, मार्क बाउचर, ग्रॅमी स्मिथ यांची नावे होती. ड्युमिनी आयपीएलमध्येही खेळला. तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. डेक्कन चार्जर्सकडून खेळताना रोहित शर्माने मुंबईविरुद्ध हॅटट्रिक घेतली तेव्हा त्यात ड्युमिनीचा बळीही समाविष्ट होता. यानंतर, २०१८ मध्ये, तो रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघातही खेळला. दोघांमधील मैत्री खूप चांगली मानली जाते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध | Ramdas Athawale
‘फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील’
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,…