शाहरुख खान, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि सलमान खान सारख्या स्टार्सना हिट गाणी देणाऱ्या प्रीतम चक्रवर्ती (Pritam Chakraborty) यांच्या ऑफिसमधून ४० लाख रुपये चोरीला गेले. या चोरीच्या घटनेबाबत प्रीतमच्या मॅनेजरने मुंबईतील मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
प्रीतमच्या ऑफिसमध्ये चोरी
प्रीतमचे (Pritam Chakraborty) व्यवस्थापक विनित छेडा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने प्रीतमच्या कामासाठी ४० लाख रुपये कार्यालयात आणले होते. जे विनीतने घेतले होते आणि मुंबईच्या ऑफिसमध्ये पैसे ठेवले होते. जेव्हा प्रीतमच्या मॅनेजरने त्याला हे ४० लाख रुपये दिले, तेव्हा प्रीतमच्या ऑफिसमध्ये काम करणारा आशिष सायल नावाचा एक व्यक्ती ऑफिसमध्ये उपस्थित होता.
प्रीतमचा मॅनेजर काही कागदपत्रांवर सही घेण्यासाठी प्रीतमच्या घरी गेला होता आणि सही करून तो ऑफिसमध्ये परतला तेव्हा त्याला दिसले की पैसे असलेली बॅग तिथे नव्हती.
ऑफिसमधील मॅनेजरने इतर कर्मचाऱ्यांना बॅगेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आशिष सायल पैशांनी भरलेली बॅग घेऊन गेला आहे. व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोबाईल बंद होता. या प्रकरणात, प्रीतमच्या कंपनीच्या व्यवस्थापकाने मुंबईतील मालाड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास करत आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली, भाजपच्या विजयानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया