RSS मार्गदर्शक असलेला भाजप समाजात अंतर पाडत आहे- सुप्रिया सुळे

बारामती – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर (BJP) पुन्हा एकदा निशाना साधला आहे. आरएसएस (RSS) मार्गदर्शक असलेला भाजप समाजात अंतर पाडत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक म्हणून आरएसएसला ओळखलं जातं. त्यांना महागाई वाढली आहे हे मान्य करायचं नाही आहे. त्या सगळ्यांनी यासंदर्भात झोपेचं सोंग घेतलं आहे. महागाईवर बोललो तर समाजात अंतर पडायला लागतं असं म्हणतात. मात्र समाजात अंतर आम्ही पाडलं नाही, आरएसएस मार्गदर्शक असलेला भाजपने समाजात अंतर पाडले आहे, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

आरएसएसचे जे जेष्ठ नेते आहे त्यांनी महागाईवर भाष्य केले आहे. मी त्यांचे स्वागत करते. काही गोष्टी वास्तवतेच्या आणि देशाच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. मी अनेक वर्ष महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक स्थितीबाबत बोलते आहे. यात कोणतेही राजकारण न आणता आज आरएसएसने जो मुद्दा मांडला त्याचं मी स्वागत करते. हा मुद्दा देशासाठी महत्त्वाचा आहे. सरकारने गंभीर होणे गरजेचे आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.