‘मोदी साहेब आपले अनंत उपकार झाले जनतेवर ,अशीच महागाई आटोक्यात आणावी ही विनंती’

पुणे : – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise duty) कमी केल्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.

केंद्राने गॅस सिलिंडरवरही दिलासा दिला आहे, इंधनाव्यतिरिक्त केंद्र सरकारने गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्यांनाही दिलासा दिला आहे आणि गॅस सिलिंडरच्या लाभार्थ्यांना 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजना. याची घोषणा करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, आम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojna) 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देऊ. यामुळे आमच्या माता-भगिनींना मदत होईल.

दरम्यान , आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (NCP leader Rupali Thombre Pati) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M. Narendra Modi) यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, ‘केंद्र सरकार, मोदी साहेब आपले अनंत उपकार झाले जनतेवर ,अशीच महागाई आटोक्यात आणावी ही विनंती’. अशा खरमरीत शब्दांत रुपाली ठोंबरे यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.