Rupali Patil | रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? ठाकरे गटाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर

Rupali Patil | शिवसेना उबाठा गटाच्या फायरब्रँड महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रूपाली पाटलांना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत X या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली (Maharashtra Politics) आहे. या पोस्टमधूनच त्यांनी रूपाली पाटलांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचं दिसत आहे. रुपाली पाटील या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत. दरम्यान सुषमा अंधारेंनी रूपाली पाटील (Rupali Patil) यांच्यासाठी केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

“निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ”, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. यावर आथा रुपाली पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like