25 कोटींचा बॉम्ब टाका, 18 कोटीपर्यंत डील फायनल करू; गोसावीच्या बॉडीगार्डच्या दाव्याने खळबळ

kiran gosavi

मुंबई : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने अनेक धक्कायादक खुलासे केले आहेत. त्यात सर्वात धक्कादायक म्हणेज आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

गोसावी आणि सॅम यांनी समीर वानखेडेंशी 18 कोटी आणि 8 कोटींची चर्चा केली होती. क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावी तसेच सॅमला निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao

Previous Post
dhananjay munde

‘भुजबळ साहेबांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी केली अन् पवार साहेबांनी एका महिन्यात मान्य केली’

Next Post
kiran gosavi - prabhakar sail

एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली, गोसावीच्या बॉडीगार्डचे धक्कादायक खुलासे

Related Posts

“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा

न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यापासून मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्री उघडपणे त्यांना झालेल्या लैंगिक…
Read More
ठाणे तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार निलंबित- देवेंद्र फडणवीस

ठाणे तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार निलंबित- देवेंद्र फडणवीस

मुंबई : ठाणे तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकऱणी गुन्हा दाखल…
Read More

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – अजित पवार

अहमदनगर :- मुळा धरणाच्या बॅक वाॅटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे…
Read More